विदर्भ वतन / नागपूर : दादर हवेली या केंद्रशासीत प्रदेशामधील पालघर येथे काही जहालवादी संघटनांनी दोन साधुंची हत्या केली. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणी लक्ष घालून ११५ चॅनलवर (डी.एस.४ न्युज) चर्चेदरम्यान कथीत स्वयंघोषीत राम सेना प्रमुख विष्णु विनोदम यांनी महाराष्ट्रातील जनतेला शिव्या-श्राप दिल्या. तसेच महाराष्ट्रात अकाल पडेल आणि येथील जनता तडफडून मरेल असे वक्तव्य त्यांनी केले. हे वक्तव्य करणार्या विष्णु विनोदमला अटक करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे यांनी केली. तसेच या वक्तव्याचा निषेध केला.
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी आणि विकसनशिल राज्य आहे. राज्यातील मराठी माणसाचा अपमान आणि बदनामी कोणी न्युज चॅनलवाले किंवा पाखंडी विष्णु विनोदम सारखे फालतु लोक करीत असेल तर महाराष्ट्र राज्य या वक्तव्याचा निषेध करते. तसेच हे चिथावणीखोर वक्तव्य करणार्याला त्वरित अटक करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे काकडे यांनी केली.
महाराष्टा्रची भूमी संत कबीर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. यांच्यामुळे महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे. तसेच या विकसनरशील राज्याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, ए.आर. अंतुले, विलासराव देशमुख या विचारवंतांनी केले आहे आणि आता उध्दव ठाकरे यांच्या हाती राज्याची धुरा आहे. पालघर हत्येमागे महाराष्ट्रातील जनतेला शिव्याश्राप देऊन बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे. महाराष्ट्रात अकाल येईल व जनता तडफडून मरेल या वक्तव्यांनी समग्र महाराष्टाचा अपमान केला आहे. या वक्तव्याची सत्यता पडताळून दोषीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी प्रधानमंत्री, वित्तमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांकडे राजेश काकडे यांनी केली आहे.

