Home गोंदिया माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे निधन

माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे निधन

139 views
0

गोंदिया:- जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे सोमवारी गोंदियातील बहेकार नर्सिग होम येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा आघात झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील आदिवासी जनतेतील मनमिळावू नेता हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी,मुली असा आप्तपरिवार आहे.