Home गोंदिया आमगाव-गोंदिया राज्य मार्गावरील ठाणा येथे अपघात

आमगाव-गोंदिया राज्य मार्गावरील ठाणा येथे अपघात

142 views
0
गर्भवती महिला व लहान मुलगी गंभीर जखमी  
 राहुल चुटे तालुका प्रतिनिधी
विदर्भ वतन न्युज पोर्टल /आमगाव : गोंदिया वरून भाजीपाला घेऊन येणार्या मिनी मेटॅडोरला ठाणा येथे अपघात झाल्याने सहा जण जखमी झाले. यात गर्भवती महिलेचा समावेश आहे. पहाटे ५. ३० वाजताच्या सुमारास गोंदियावरून आमगाव करिता भाजीपाला घेऊन निघालेली मिनी मेटॅडोरला  हा अपघात झाला.
एम. एच. ३५- एजे-१५७०  वाहन चालक जितू अशोक पाथोडे हा  भाजीपाला आणि टमाटरने भरलेले कॅरेट घेऊन येत असतांना अदासी दहेगाव मार्गावर हैदराबाद येथुन काही मजुर पायी जात होते. सामोरच्या स्टॉपपर्यंत गाडीत जागा मिळावी म्हणुन या मजुरांनी गाडीला थांबण्याची विनंती केली. चालक अशोक यांनी मदत म्हणून या १० मजुरांची विचारपुस करून गाडीत बसवून घेतले. ठाणा या गावाजवळ आमगाव कडून पोल्ट्रीची आयसर गाडी वेगाने येत असल्याने अशोकने त्याला साईड देण्याकरिता आपली गाडी रोडखाली घेतली असता त्याचे संतुलन बिघडल्याने गाडी पलटून अपघात झाला. या अपघातात सहा मजूर जखमी झाले. त्यात एका लहान मुलीचा हात फ्रॅक्चर झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येते तर गर्भवती महिला गंभीर जखमी झाली आहे. गावात माहिती मिळताच पोलीस पाटील प्रदीप बावनथडे यांनी ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी बोलावून जखमींना गोंदिया येथे उपचारासाठी पाठविले.