
ग्रामीण भागातील समाजबांधवांना मिळाला आधार
राहुल कान्होलकर
विदर्भ वतन न्युज पोर्टल / नरखेड : लॉकडाऊनचा फटका सलून दुकान, त्यात काम करणारे कारागीर व समाजबांधवांना मोठ्या प्रमाणात बसला. अशा दुकानदानांची आर्थिक बाजू कमकुवत झालेल्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक योगेश कोठेकर यांनी धान्य व किराणा वस्तूच्या किटचे वाटप केले. या उपक्रमासाठी त्यांनी ८० हजार रूपये किमतीचे जीवनावश्यक वस्तुंचे १०० किट तयार करून नरखेड तालुक्यातील गावोगावी जावून वाटप केले. लॉकडाऊनचा आता तिसरा टप्पा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत योगेश कोठेकर यांनी केलेली ही मदत म्हणजे कुटुंबाला जगण्यासाठी खुप मोठा आधार झाला असल्याच्या भावना समाजबांधवांनी व्यक्त केल्या. या उपक्रमासाठी नाभिक एकता मंच नरखेड तालुका अध्यक्ष राहुल कान्होलकर, कमलेश नागपूरकर, वसंत पेठे, प्रफुल नागपूरकर, रमेश धानोरकर, संजय लक्षणे, अतुल नागपूरकर, हेमंत आस्कर, सुरज खडसे, निलेश नागपूरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

