नाभिक एकता मंच नरखेडच्यावतीने गरजुंना धान्य व किराणा किटचे वाटप

263
राहुल कान्होलकर
विदर्भ वतन न्युज पोर्टल / नरखेड : जगभरात कोविड-१९, कोरोना या वायरसला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम भारताने लॉकडाऊनचा मार्ग अवलंबविला.सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला घरातच कोंबुन ठेवले. या लॉकडाऊनमुळे सामान्य व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली. शासनाने रॅशन दुकानामार्फत बरीच मदत केली पण ती पुरेशी ठरली नाही. अगदी रॅशन कार्डच्या आधारावर अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करण्यात आले, त्यामुळे अनेकांची तसेच खर्या गरजवंतांची निराशा झाली. देशात वास्तव्यात असलेल्या अशाच नाभिक समाजाची देखील मोठी दुर्दशा झाली आहे. ‘ना शासकीय मदत, ना हाताला काम’ या दुहेरी कचाट्यात सापडलेला नाभिक समाजाचा व्यवसाय आज देशोधडीला लागल्याचे चित्र आहे. बोटावर मोजक्या लोकांचीच मोठ्या स्वरूपाची केश कर्तनालये आहेत. त्यांचेकडे काम करणारे कारागिरही आहेत. आता या कारागिरांना काम नसल्यामुळे त्यांची अवस्था फार गंभीर झाली आहे. अनेकांची दुकाने किरायाच्या जागेवर असल्यामुळे दुकानाचे भाडे थकीत आहेत. अशात घरमालकाचे किरायाच्या पैशासाठी रडगर्हाने रोजचीच डोकेदुखी झाली आहे. अशा या परिस्थीतीत या समाजाने नेमके करायचे तरी काय?
समाजातील काही सघन दानशुरांनी आपल्या समाजातील अशा कमकुवत वर्गाची जाण ठेवून त्यांना मदतीचा हात दिला आहे. नरखेड तालुका नाभिक एकता मंचच्या वतीने अशा गरजू दुकानदार, कारागीर व दुबळ्या समाज बांधवांना धान्य आणि किराणा वस्तुच्या किटचे वाटप करून आपले सामाजिक दायित्व सिध्द केले. हा उपक्रम नाभिक एकता मंच नरखेड तालुका अध्यक्ष राहुल कान्होलकर, कमलेश नागपूरकर, वसंत पेठे, प्रफुल नागपूरकर, रमेश धानोरकर, संजय लक्षणे, अतुल नागपूरकर, हेमंत आस्कर, सुरज खडसे, निलेश नागपूरकर यांनी अथक परिश्रम घेऊन राबविला.