Home गोंदिया सहा.पो. नि. भाष्कर, बघेले यांचेसह ११ जणांना पोलिस महासंचालक पदक

सहा.पो. नि. भाष्कर, बघेले यांचेसह ११ जणांना पोलिस महासंचालक पदक

120 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल /गोंदिया : पोलीस दलात उत्तम कामगिरी करणार््या पोलीस अधिकारी व कर्मचार््यांना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानित केले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. नक्षल्याविरुध्द केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल हा पदक जाहिर करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने नक्षल सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागेश भाष्कर (देवरी), नक्षल आपरेशन सेल गोंदियाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोदकुमार केशरीचंद बघेले, बिनतारी संदेश विभाग देवरी पोलिस उपनिरिक्षक दिलीप जाधव तर कर्मचार्यांमध्ये पोलिस हवालदार रमेश खंडाते, नक्षल सेल स्वर्णदिप भालाधरे, राजेंद्र भेंडारकर, रीना चव्हाण, सुदर्शन वासनिक, पोलिस मुख्यालयातील मुस्ताक अहमद वारिस सय््यद, प्रभाकर पालांदूरकर, सायबर सेलचे धनजंय शेंडे आदींचा समावेश आहे.या सर्वांचे पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.