काळी माती हनुमान मंदिर परिसरात विकास कामाचे भूमिपूजन

206

विदर्भ वतन न्युज पोर्टल / गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान हनुमान मंदिर काळी माती येथे तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत पेवर ब्लॉक लावणे व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद क्षेत्र माहूरकुडाचे सदस्य गिरीश पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नवेगाव जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर करणे व ग्रामपंचायत सुकळीचे सरपंच चंदेल प्रामुख्याने उपस्थित होते. सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून सदर भूमिपूजन करण्यात आले. हनुमान मंदिर काळीमाती देवस्थानाला तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत वीस लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्याबाबत परिसरातील जनतेने मान्यवरांचे आभार मानले.