शेतकरी आणि कॉटन जिनींगला दिला गडकरी यांनी मदतीचा हात

164
विदर्भ वतन न्युज पोर्टल / नागपूर : विदर्भातील कॉटन जिनींग व्यावसायीकांना कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून जे लक्ष्य देण्यात आले होते ते कापूस ओला झाल्याने आणि खरेदीला विलंब झाल्याने गाठता आले नाही. त्यामुळे यात ०.५ टक्के सुट मिळावी अशी विदर्भातील जिनींग व्यावसायीकांकडून करण्यात आली. या मागणीला बळ देण्याकरिता या व्यावसायीकांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे साकडे घातले. या मागणीला मान देत गडकरी यांनी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी याचंसोबत संपर्क करून आपले पाठबळ दिले.
कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती आणि याच कालावधीत आलेले सण तसेच अन्य कारणांमुळे कापसातील लिंट व रूई वेगळे करण्याच्या कामास विलंब झाला. त्यातच कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाच्या वतीने मार्चमध्ये ३४ टक्के लिंट व ६६ टक्के रूई काढून देण्याचे लक्ष्य दिले होते. यामध्ये एप्रिल, मे व जून या महिन्यात ३४.५ टक्के, ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होणार होती. मात्र, उपरोक्त परिस्थितीमुळे हे लक्ष्य गाठणे शक्य झाले नाही. त्यामुळे यात सुट मिळावी अशी विनंती विदर्भातुन करण्यात आली. मार्चमध्ये ठरलेल्या दरात केवळ ०.५ टक्का वाढ करून लिंट व रूई काढून देण्याचे काम दिले, यामुळे शेतकर्यांकडे पडून असलेला जवळपास २५ टक्के कापूस बाजारात येवून शेतकर्यांना त्याचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.  यामुळे अंतर्गत गरजा पूर्ण झाल्यावर त्याची निर्यात करणे शक्य होणार आहे.