हुडकेश्वर पोलिस ठाण्यासामोरच सलुनचे दुकान सुरू, लॉकडाऊनचा फज्जा

290
विदर्भ वतन न्युज पोर्टल / नागपूर : कोरोना हा वायरस नियंत्रणात यावा याकरिता देशभरात लॉकडाऊनचे सत्र सुरू असताना पुर्णपणे याची अमलबजावणी व्हावी याकरिता पोलिस आणि स्थानिय प्रशासन सज्ज असुन या विभागाची युध्द पातळीवर दिवस रात्र गस्त सुरू आहे. मात्र, अगदी हुडकेश्वर पोलिस ठाण्यासामोर भरदिवसा आपले सलुनचे दुकान सुरू करून हुडकेश्वर पोलिसांना एकप्रकारे आवाहनच दिले आहे. शिवाय याच परिसरात सकाळी भाजीपाल्याचा मोठा बाजार भरतो या बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा प्रशासनातील अधिकारी पहारा देऊन असतात त्यांचे सुध्दा या दुकानाकडे लक्ष नसल्याने हे अधिकरी – कर्मचारी झोपेत तर कर्तव्य बजावत नाही ना? असा संशय येतो.
सा. विदर्भ वतन आणि न्युज पोर्टलला माहिती मिळताच या प्रकाराची सत्यता पडताळून पाहण्याकरिता गेले असता सोशल डिस्टन्सींगला मुठमाती देत बिजय शंकर श्रीवास हा इसम एक ग्राहकाची कटिंग करत होता. त्याला हे सलुनचे दुकान सुरू करण्याची परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली असता त्याने उडवा-उडविची उत्तरे देणे सुरू केले. हा इसम मुळ उत्तरप्रदेशातील बनारस येथील रहिवाशी असुन १९८१ पासुन येथे वास्तव्यात आहे. त्याचे दुकान हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या नाकासामोर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकाही पोलिस कर्मचार्याची या दुकानाकडे नजर कशी गेली नाही?  यामुळे या पोलिस स्टेशनच्या कामगिरीवर शंका येते.
इतर दुकानांपेक्षा सलुनच्या दुकानात सोशल डिस्टंसिंग पाळली जावू शकता नाही, ग्राहकाला निदान विस मिनिटेतरी चिकटून असल्याशिवाय कटिंग करता येवू शकत नाही. मात्र प्रत्यक्ष काढलेल्या फोटो मध्ये ग्राहक आणि दुकानदारांनी कुठलाही मास घातल्याचे देखील दिसुन येत नाही. त्यामुळे हे सलुनधारक कोरोना वाहक नक्कीच होऊ शकतात. याकडे पोलिस आणि मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे या इसमाजवळ रॅशन कार्ड असल्याचे त्याने सांगीतले. लॉकडाऊनदरम्यान दोन वेळचे अन्न मिळावे याकरिता प्रशासनाने भरभरून रॅशन दिले आहे आणि आताही दिले जात आहे. याव्यतिरीक्त शहरभरात सामाजिक संस्थासुध्दा सातत्याने धान्य वाटप करतच आहेत मात्र, रॅशन मिळत नसल्याचे कारण सांगुन दुकान खोलण्यासाठी अनेकजण पळवाटा काढतांना दिसुन येते. यातलाच हा एक प्रकार आहे. शहरात मराठी सलुन व्यावसायीकांनी लॉकडाऊनला साथ देत आपली दुकाने बंद ठेवली आहे. पण १९८१ पासुन नागपुरात वास्तव्यात असलेल्या बिजय श्रीवास या हेकेखोर इसमाने शासन-प्रशासनाच्या कायद्याला पायाखाली तुडवून आम्ही परप्रांतीय महाराष्ट्राच्या कोणत्याच कायद्याला माननार नाही जणू असेच यातुन संकेत दिले आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि. राजकमल वाघमारे यांचेशी मोबाईलवर संपर्क साधला असता फोन ‘नॉट रिचेबल’ होता.