Home नागपूर देशात कोविड-१९ चे सर्वोच्च नियोजन

देशात कोविड-१९ चे सर्वोच्च नियोजन

84 views
0
वृत्तसंस्था
विदर्भ वतन न्युज पोर्टल / नागपूर : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या देशभरातील सभासदांशी संवाद साधला. या क्लबने फंडासाठी ९.१ कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल तसेच विविध मुख्यमंत्री मदत निधीसाठी १२.५ कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी त्यांचे आभार मानले. सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि समर्पित कोविडयोद्धे, हितसंबंधीय अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोविड-१९ च्या लढ्यात विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. कोविड-१९ चे व्यवस्थापन आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि इतर संबंधित विषयांबाबत त्यांनी माहिती घेतली. कोविड-१९ पोर्टल आणि आरोग्य सेतु अ‍ॅप संदर्भातील अ‍ॅप यांच्या कामाविषयी यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. बिगर-कोविड आजारांसाठीच्या आवश्यक वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, यावर आरोग्यसचिवांनी भर दिला. डायलीसीस, कर्करोग उपचार, गर्भवती महिला, हृदयरोगी अशा गंभीर आजारांचे रुग्ण किंवा तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक असणार्याा व्यक्तींची योग्य ती वैद्यकीय काळजी घेतली जावी, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जनतेच्या आसपास असलेल्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील, याची राज्यांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कोविड-१९ च्या व्यवस्थापनाविषयी बोलताना आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि महासंचालक डॉ. बलराम भार्गवा म्हणाले की, रुग्णांच्या नमुन्यांचे संकलन आणि त्यानुसार फॉर्म भरणे ही कामे अत्यंत जबाबदारी आणि चिकाटीने करणे आवश्यक आहे. आतापर्यंत देशात ७६९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर सध्या २४.५%  इतका आहे. तसेच, देशभरात सध्या कोविडचे एकूण ३१,३३२ रुग्ण आहेत.