Home गोंदिया सर्पदंशाने शेतकर्याचा मृत्यू

सर्पदंशाने शेतकर्याचा मृत्यू

170 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल / साखरीटोला : शेतात काम करणार्या इसमाचा साप चावल्याने मृत्यू झाला. भागवत मंगरू मडावी (४५) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. सालेकसा तालुक्यांतर्गत दरेकसा सर्कलमधील वंजारी या गावातील हा शेतकरी होता. शेतात मशागतीचे कामासाठी तो गेला असताना अचानक सापाने चावा घेतल्यामुळे चक्कर येवून तो जागीच बेहोश होऊन पडला. घरी परतले नसल्यामुळे घरच्यांनी शेतात जाऊन पाहिले असता बेहोश अवस्थेत आढळले. लगेच त्यांना सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. मात्र, रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शासनाकडून भागवत मडावी यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शहारे करीत आहेत.