ााराभाटी व देवलगावचे टावर सुरू करा

193
ग्राहकांची मागणी, सात दिवसापासून बंद
विदर्भ वतन न्युज पोर्टल/ अर्जुनी मोरगाव :  येथील वोडाफोन आणि देवलगावच्या जीओ कंपनीचे टावर गत सात दिवसापासुन बंद आहेत, त्यामुळे ग्राहकांची स्वकियांसोबत संपर्क साधण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. हे दोनही टावर तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी ग्राहकांनी केली.
ग्राहक सेवा देणार्या अधिकार्यांना अनेकदा ही बाब लक्षात आणुन दिली पण त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. बाराभाटीतील वोडाफोन टावरच्या अनेकदा तक्रारी आल्या आहेत पण टावरची देखरेख दुरूस्ती करणारे अधिकारी या समस्येची दखल घेत नाहीत. त्याचप्रकारे देवलगाव (पंचवटी) येथील जीओ कंपनीचा टावर हा सुद्धा बंद करुन ठेवण्यात आला आहे. सदर दोनही टावर बंद असल्यामुळे परिसरातील १०-१२ गावांत नेटवर्कच नाही, यामुळे नागरिकांचा परस्परांशी संपर्क होत नाही, मोबाईल मधला इंटरनेट तर अजिबात चालत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रीया नागरीकांनी दिल्या.