Home गोंदिया बाराभाटी व देवलगावचे टाँवर सुरु करा, ग्राहकांची मागणी : सात दिवसापासून बंद

बाराभाटी व देवलगावचे टाँवर सुरु करा, ग्राहकांची मागणी : सात दिवसापासून बंद

79 views
0

अर्जुनी मोरगाव :
स्थानिक ठिकाणचा वोडाफोन कंपनी व देवलगावचा जीओ कंपनीचे दोनही टाँवर सात दिवसापासून बंद आहेत, त्यामूळे ग्राहकांची खूप अडचण निर्माण झाली आहे, म्हणून दोनही टाँवर तात्काळ सुरु करा असी ग्राहकांनी कडकडीची मागणी केली आहे.

या संबधाने ग्राहक सेवा देणारे अधिकारी यांच्यासी अनेकवेळा वार्तालाप केल्यावर ते ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तरे देवून फोन कापतात, बाराभाटीच्या वोडाफोन ह्या टाँवरच्या अनेकदा तक्रारी आहेत पण टाँवरची काळजी व देखरेख करणारे अधिकारी हे टाँवर सुरु करत नाही,

त्याचप्रकारे देवलगाव(पंचवटी) येथील जीओ कंपनीचा टाँवर हा सुद्धा बंद करुन ठेवण्यात आला असून, ग्राहकांची चांगलीच अडचण या कंपनीवाल्यांनी केली आहे,

सदर दोनही टाँवर बंद असल्यामूळे परिसरातील १०-१२ गावांत भ्रमणध्वनींचा नेटवर्क नाही, यामूळे नागरिकांचा परस्पर संपर्क होत नाही, मोबाईलमधला इंटरनेट अजिबात चालत नाही असे नागरीक सांगत आहेत,

सुहाष बोरकर, तेजस कांबळे, मयूर खोब्रागडे, प्रशिक बोरकर, सम्यक बोरकर, किर्तीकुमार खोब्रागडे, सुरेंद्र मेश्राम, मनमित कांबळे, मुन्नाभाई नंदागवळी आदी ग्राहक व येरंडी, देवलगाव, बाराभाटी, कुंभिटोला, सुकळी, खैरी, ब्राम्हणटोला, डोंगरगाव, कवठा, बोळदे, आदी गावांच्या परिसरातील ग्राहकांची मागणी आहे.