मुलाने केली आईची हत्या

187

राहुल चुटे तालुका प्रतिनिधी आमगाव आमगाव :-

आमगाव तालुक्यातील बाम्हणी गावातील ऐका मुलाने आपल्या जन्मदात्या आईला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून हत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. तालुक्यातील आमगाव देवरी रोडवरील बाम्हणी गावातील प्रमोद मनीराम शेंडे वय ३८ वर्षे हा नेहमी गोठयात पलंगावर झोपत असतो. आज सकाळी २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता गोठयात झोपला 2 असता प्रमोद ची आई मिनाबाई शेंडे वय ५५ वर्षे नेहमीप्रमाणे गोठा साफ करण्यासाठी आली व झोपलेल्या प्रमोदला हाक देऊन उठवू लागली. मला दररोज सकाळी सकाळी उठवून माझी झोप मोडीत असते असे म्हणून बाजूला असलेली कुऱ्हाड उचलून रागाच्या भरात दांड्याने वार केला. रक्तबंबाळ झालेल्या मिनाबाईला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान मिनाबाई मरण पावली. ही बातमी गावात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर महिलेच्या पती मनीराम शेंडे वय ५८ वर्षे यांच्या तक्रारीवरून जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलाविरुद्ध भा द वी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम काळे व त्यांची चमू करीत आहेत.