
विदर्भ वतन, नागपूर – अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाबद्दल प्रतिक्रिया देतांना विदर्भ वतन वृत्तपत्राशी बोलतांना हास्यकलावंत तथा अभिनेते सुनिल पाल यांनी इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा दिला़ ते यावेळी अतिशय भावुक झालेले होते़ त्यांनी विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टलशी बोलतांना सांगितले की, लाफ्टर चँलेंज हा कार्यक्रम करीत असतांना मी इरफान खान यांच्या आवाजाची नक्कल केली होती़
त्यावेळी मला स्वत: इरफान खान यांनी फोन करून ‘मला फेमस केले तुम्ही’ असे म्हणत भविष्यातील वाटचालीसाठी मला शुभेच्छा दिल्या होत्या़ त्याचबरोबर आम्ही ‘क्रेझी ४’ या सिनेमामध्ये सोबत काम करीत असतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व अभिनय शैलीचा मी प्रसंशक झालो असेही सुनिल पाल यांनी सांगितले़ मी माझा उत्तम सहकारी, मित्र, बंधु,जीवाभावाचा सहकारी गमावला असे सुनिल पाल यांनी विदर्भ वतनयह बोलतांना सांगितले़ तसेच इरफान खान यांची आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खान यांच्या अभिनयाची पोकळी कधीही न भरून निघण्यासारखी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले़

