अद्वैत संस्थेची दोन हजारांवर गरीबांना मदत 

300
विदर्भ वतन न्युज पोर्टल /नागपूर : अद्वैत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गरीबांना मदत करणे सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन ते अडीच हजार कामगार, निरश्रीत आणि गरीबांना धान्य व किराणा मालाची मदत करण्यात आली आहे.
 कोरोनाच्या प्रादुभावार्मुळे हजारो मजूरवर्ग संकटात सापडला आहे. परप्रांतीय कामगारही शहरात अडकला आहे. त्यांची गैरसोय होऊ नये या भावनेतून मागील २५ मार्चपासून या संस्थेतील पदाधिकाºयांचे कार्य सुरू आहे. राशन कार्ड नसलेल्या तसेच धान्याची मदत हवी असलेल्या गरीबांना भेटून तांदूळ, कणिक, तेल, तिखट, हळद अशा साहित्याची किट तयार करून वितरित केली जात आहे. शहरातील धनगवळी नगर, विजया नगर, सुभाष नगर, तुकडोजी पुतळा, दिघोरी, दवलामेटी ग्रामपंचायत, संजय गांधी नगर आदी भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांना ही मदत दिली जात आहे. या कार्यात अध्यक्ष शुभम जगताप, राजेश टिकले, प्रतिक कामोने, कौस्तूभ धोटे, कुणाल इटणकर ,अभिषेक खोलकुटे, अक्षय अनमुलवार, अनिकेत महींद्रे, अंकित गावले, अमन कडू, मकरंद बोंडे,  रोशन हेलोंडे , इशांत आगलावे आदींचा सहभाग आहे.
मजुरांच्या शिशुचीही काळजी
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांच्या लहान मुलांच्या आहाराची हेळसांड होऊ नये यासाठी या बाळांना पोषण आहाराचे वितरणही केले जात आहे. संस्थेचे पदाधिकारी स्वखचार्तून हे कार्य करीत आहे. सर्वांनी स्वेच्छेने निधी गोळा करून त्यातून धान्य व किराणा वाटपाचे रोज नियोजन केले जाते.