Home गोंदिया राज्य महामार्ग देतोय मृत्यूला आमंत्रण

राज्य महामार्ग देतोय मृत्यूला आमंत्रण

0
वडसा अर्जुनी, मोरगाव, कोहमारा, गोंदिया या राज्य महामार्गाची झाली चाळण
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी मोर : गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे राज्य महामार्ग क्रमांक २७५ असून राज्य महामार्ग नावापुरताच उरला आहे. सध्या या मार्गावरून आवागमन करणारे वाटसरू या राज्य महामार्गापेक्षा पांदन रस्ता बरा असे बोलू लागले आहेत मात्र निगरगट्ट प्रशासनाला याची जाणीव केव्हा होईल असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून या मार्गाची दैनावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता उखडलेला असून ती बाहेर निघून पडलेली आहे १८ डिसेंबर २०१८ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या राज्यमार्गावर सदा सावलीचे झाडे लावून तसेच टायर जाळून आंदोलन केले होते त्याचा धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभाग अर्जुनी-मोर यांनी काही ठिकाणी गिट्टी टाकून व मुरमाचा लेप देऊन डागडुजी केली मात्र, काम न झाल्याने अजुन या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यावर एक- दीड फूट खोल खड्डे पडले असून अनेकदा अपघात सुद्धा भेटले आहेत. गोंदिया गोरेगाव नवेगाव बांध अर्जुनी-मोर या दरम्यान काही ठिकाणी कामे झाली असून काही ठिकाणी रस्ता बांधकाम बाकी आहे. काही ठिकाणी सीडी वर्क बांधकाम झाले असून हे बांधकाम करताना रस्ता खोदण्यात आला, त्याची सुद्धा गिट्टी बाहेर निघालेली आहे त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे शिडी वर्कचे काम झाल्याने आतातरी पूर्णकाम रस्त्याचे होईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र अनेक दिवसांपासून काम कासवगतीने सुरू होते व आता तर पूर्ण बंद आहे त्यामुळे या वर्षाचा पावसाळासुद्धा अस्ताव्यस्त फुटलेल्या रस्त्यावरूनच जनतेला आवागमन करावे लागणार आहे. याविषयी अजुर्नी-मोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनुने यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, यावर्षी या रस्त्याचे पूर्ण बांधकाम होणे मुश्कील आहे आम्ही प्रयत्न करीत असून पुढल्या वर्षी रस्ता बांधकाम पूर्ण करून देण्याची अवधी आहे त्यामुळे यावर्षी सुद्धा फुटलेल्या रस्त्यावरूनच जनतेला आवागमन करावे लागणार हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here