Home गोंदिया बिबट्याने केली हल्ल्याची शिकार

बिबट्याने केली हल्ल्याची शिकार

86 views
0

ईटखेडा येथे वाघाची दहशत
संतोष रोकडे
विदर्भ वतन न्यूज पोर्टल / अर्जुनी मोरगाव: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा परिसरात वाघाची व अस्वलाची दहशत पसरली आहे त्यामुळे परिसरातील जनतेला घराबाहेर पडणे मुश्कील झाली आहे दिनांक २३ ला मध्यरात्री इटखेडा येथील अरुण गोपाळा पंधरे यांच्या अंगणात म्हशी बांधल्या होत्या त्यापैकी नऊ महिन्याच्या हल्यावर हल्ला करून त्याला ओढत बाजूला नेऊन त्याचा फडशा पाडला. जनावर मालक अरुण याचे मोठे आर्थिक नुकसान झाले वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अरुण याने नुकसानभरपाईची मागणी वन विभागाकडे केली आहे. काही वर्षांपूर्वी याच गावात अस्वलाच्या हल्ल्यात एक मृत्युमुखी तर तीन जण गंभीर जखमी झाले होते वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.