राज्यात चाइल्ड फ्रेंडली पुरस्कारात शिरेगाव बांध प्रथम

202
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी मोर : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील शिरेगाव बांध ग्रामपंचायत केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाचा चाईल्ड फ्रेंडली पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्र राज्यातील ही ग्रामपंचायत एकमेव ठरली.
पंचायतराज मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. संजीव पटजोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र निघाले या पत्रात महाराष्ट्रातील शिरेगाव बांध या एकमेव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यापूर्वी या गावाला केंद्र शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुका जिल्हा नागपूर विभागातून पुरस्कार आणि केंद्र शासनाचा दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीचे सरपंच हेमकृष्ण उर्फ दादा संग्रामे यांच्या नेतृत्वात उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच संपूर्ण सिरेगाव बांधवासी जनता एकजुटीने गावाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असतात
त्यांच्या या यशात सेवानिवृत्त गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमवार, विद्यमान गटविकास अधिकारी मयूर अंदे लवाढ, विस्तार अधिकारी राजेंद्र वलथरे अनुप व इतर पंचायत समिती कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.