Home गोंदिया देवलगाव येथे हायपो क्लोराईड द्रावणाची फवारणी

देवलगाव येथे हायपो क्लोराईड द्रावणाची फवारणी

73 views
0

विदर्भ वतन / विदर्भ वतन : तालुक्यातील ग्रामपंचायत देवगाव अंतर्गत देवलगाव व पंचवटी या दोन्ही गावांमध्ये सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समितीकडून हायपो क्लोराइड द्रावणाची फवारणी करण्यात आली. संपूर्ण देश कोविड – १९ वायरसच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाला आहे. या आजाराच्या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी देवगाव येथील सामाजिक सेवा समितीच्या सहकार्याने फवारणी केली. यावेळी सरपंच तामदेव पाटील कापगते, उपसरपंच होमराज पुस्तोडे, सचीव कालीदास पुस्तोडे तसेच सर्वच ग्रामपंचायत सदस्य, को-आॅ. बँकेचे संचालक केवलराम पुस्तोडे उपस्थित होते या कार्याबद्दल किशोर तरोणे यांचे गावकर्यांनी यांनी आभार मानले.