Home नागपूर विदभार्तील दुर्बल शेतकर्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता

विदभार्तील दुर्बल शेतकर्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता

107 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल / नागपूर : केंद्र सरकारने लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार शेती आणि पूरक कामांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीविषयक सर्व कामे मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकर््यांना मदत करण्याच्या उद्देशाने ’प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या पहिल्या हप्त्याचे थेट हस्तांतरण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकर््यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. पी.एम. किसान योजना छोट्या आणि गरीब शेतकर््यांना प्रत्येक हंगामात येणार््या उत्पन्नाचा अंदाज घेऊन त्यानुसार पिकांच्या उत्तम वाढीसाठी तसेच योग्य उत्पादनासाठी आर्थिक मदत देते. या योजनेद्वारे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात एका वर्षाला दोन हजार रुपयांचे तीन हप्ते, असे एकूण सहा हजार रुपये थेट हस्तांतरित केले जातात. केंद्र सरकारने आतापर्यंत ७.४७ कोटी छोट्या आणि गरीब शेतकर्यांच्या खात्यात १४,९४६ कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.