
विदर्भ वतन न्यूज पोर्टल / नागपूर : शहरातील बिहार फाऊंडेशनचे पेट्रोन अरूण सिंह आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक कुमार यांच्या पुढाकाराने दिनांक १६ एप्रिल रोजी पारडी आणि हिंगणा परिसरात २५० जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रवक्ता ऋषिकेश ठाकुर यांनी दिली. याशिवाय दररोज शहरातील विविध भागात जाऊन बिहार फाऊंडेशनच्या चमुतर्फे गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत असल्याचे ठाकुर यांनी सांगीतले. मात्र, फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक कुमार यांनी स्वत: हिंगणा, वानाडोंगरी येथे येवून आपल्या चमूसह धान्य किटचे वाटप केले. यावेळी प्रविण सिंह, मुकेश सिंह, कुमार अरविंद सिंह यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष के.पी. सिंह यांनी श्रीनिवास सिंह, कमला शंकर पाठक, राजेश तिवारी या सदस्यांच्या उपस्थितीत पारडी परिसरात जाऊन धान्य वाटप केले.
शहरभर सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. जवाहर गिरी, अनिल कुमार सिंह, अरविंद कुमार, ए. के. वर्मा, प्रेम कुमार मिश्रा, रमन कुमारा झा, मनोज कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. शहरात सक्रिय असलेली बिहार फाऊंडेशन या कार्याकरिता महाराष्ट्राचे सीईओ रविशंकर श्रीवास्तव, मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रभारी अभय कुमार यांनी प्रोत्साहित आणि मार्गदर्शन केल्याबद्दल शहर चमुतर्फे यांचे आभार व्यक्त केले.

