Home नागपूर सलून व्यावसायीकांनी दिला मदतीचा हात

सलून व्यावसायीकांनी दिला मदतीचा हात

178 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल / नागपूर : लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यवसायावर गदा आली असताना समाजातील सघन वर्गाने आपआपल्या शक्तीनुसार मानव समाज जगविण्यासाठी धडपड चालविल्याचे सर्वत्र चित्र आहे. अशातच सलून व्यावसायीकांवर देखील अशीच वेळ आली आहे. हा व्यवसाय करणारा प्रत्येक व्यक्ती किंवा सलूनमध्ये काम करणार्या कामगारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. हा व्यवसाय करणारे बरेच व्यावसायीक किरायाने जागा घेऊन आपला रोजगार मिळवितात तर काहींची जागा किरायाने जागा घेण्याची शक्ती नसेल तर रस्त्याच्या बाजूला दिवसभरासाठी दुकान थाटून रोजीरोटी कमावितात. त्यामुळे याच समाजातील एका वर्गाने आपल्या अर्थशक्तीनुसार पैसा आणि अन्नधान्य गोळा करून पारडी या परिसरात मदतीचा हात दिला आहे.