जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

266

विदर्भ वतन न्यूज पोर्टल/ नागपूर : कोरोना हा वायरस पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनमुळे समाजातील दुर्बल घटकांमध्ये रोजच्या कमाविण्याच्या आणि जगण्याच्या दिनचर्येला पूर्णपणे विराम लागला. हाताला काम नाही, काम नाही तर पैसा नाही आणि पैसा नाही तर घरात अन्नधान्य नाही. ही मानविय गरज ओळखून या लॉकडाऊनमध्ये अनेक सामाजीक रूण जपणार्यांनी मदतीचे हात सढळपणे मोकळे केले. त्यामुळे शहरभरात सर्वत्र दोन्ही वेळेच्या भोजनासह जीवनावश्यक वस्तू सहजपणे गरजूंच्या घरोघरी पोहचता करून दिल्या. असाच एक उपक्रम नरसाळा रोडवरी रितेश आंभोरे, अक्षय धजेकर, प्रतीक धोटे, आल्हाद श्रीवास्कर, अभिनव श्रीराव, अनुराग हरणे, दर्शन अंबिलडुके, पियुष काळे, प्रविण वाघमारे आणि प्रियशील माटे या दानविरांनी अनेक गरजवंतांना सढळहस्ते धान्य वाटप करून मानव समाजाला जगविण्यास हातभार लावला.