गजानन कुकडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली

239
विदर्भ वतन न्यूज पोर्टल/ नागपूर : भंडारा येथील गजानन विजयराव कुकडकर यांचे दिनांक १९ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आजारामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते ३८ वर्षाचे होते. सोमवार, दिनांक २० रोजी त्यांचे पार्थिवार भंडारा येथील वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन भावंड असा आप्त परिवार आहे.
गजानन कुकडकर हे २००३-०४ ला नाभिक विद्यार्थी संघटना, भंडारा या समितीत सक्रिय पदाधिकारी होते. या संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या ‘नाभिक कौशल्य विकास-२०१७’ आणि ‘विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर मेळावा-२०१९’ या कार्यक्रमात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. नाभिक युवा मंच, भंडाराचे शरद उरकुडे, रवी लांजेवार, सुधीर उरकुडे, आदीनाथ सूर्यवंशी, सुरज नागमोते आदींनी त्यांना श्रध्दांजली अर्पित केली.