Home नागपूर रिक्त झालेली पुस्तके दान करण्याचे आवाहन

रिक्त झालेली पुस्तके दान करण्याचे आवाहन

0
रिक्त झालेली पुस्तके दान करण्याचे आवाहन

विदर्भ वतन / नागपूर : कोविड-१९ या वायरसमुळे सुरक्षितेचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून शैक्षणीक क्षेत्रातही परिक्षा घेणे थांबवून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे येत्या काळात सामान्य लोकांना आपल्या पाल्यांच्या शैक्षणीक खर्चासाठी आर्थीक अडचणींना सामोर जावे लागू शकते. अशात विद्यार्थ्यांच्या पालकांना मदतीचा एक हात म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यात आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी स्वत:जवळ असलेली मागील वर्षाची पुस्तके सामाजीक जाणीव ओळखून दुसºयांच्या कामी यावी यासाठी मदत म्हणून आपली पुस्तके द्यावी या उपक्रमासाठी ‘नायक फाऊंडेशन’ने पुढकार घेतला आहे. १ ते १२ वी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांची पुस्तके जमा करण्यात येत असून यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाचा समावेश आहे. खाली दिलेल्या फोन नंबर्सवर फोन केल्यास फाऊंडेशनचे कार्यकर्ते स्वत: येऊन आपल्याकडील पुस्तके गोळा करतील. तसेच ज्यांना या पुस्तकांची आवश्यकता असेल किंवा ज्या गरिब विद्यार्थ्याला वरच्या वर्गात प्रवेश मिळाला असेल त्यांनी ‘नायक फाऊंडेशन पहिला माळा, महाराष्ट्र बँक बिल्डींग नागपूर, भगवान नगर – ४४००२७ या पत्त्यावर किंवा दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन नायक फाऊंडेशनचे अध्यक्ष चंदू पाटिल यांनी केले.
चंदू पाटिल – ९०२८४९०२०८, अरविंद पाटील – ८०८०११०९६५, मुस्ताक पठाण – ९४२३०६३११६, भास्कर उके – ९८२३२४३६२६, ठवले – ८६०००४४५६०, वाघमारे मॅडम – ९८३४७५२३२८, सुनील चौधरी – ९३७३१२६४५०, मृणाल यादव – ८३२९२६१३७२, रवी पाटील – ९०२८०८१२७३, जी. एम. साखरकर – ७८८७८९४२३०, खूशी मॅडम – ९५९५३२७०६२, अंकीत राऊत – ९९२२०२५८४९ आणि मंगला तिरपूडे – ९९७५३२९००५.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here