विदर्भ वतन समूहाच्यावतीने गरजूंना अन्नधान्याचे वाटप

245

विदर्भ वतन न्युज पोर्टल,नागपूर – कोरोनाचे संकट देशासह जगभर घोंगावत असतांना लाँकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे़ रोजगार बंद असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची चणचणही काही प्रमाणात भासत आहे़ सामाजिक संस्था अथवा शासन आपल्यापरीने प्रयत्न करित असतांनाच विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युजपोर्टलच्या वतीने सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळावा या उद्देशाने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे़ गहू,तांदूळ या खाद्यान्न देऊन गरजूंना काही प्रमाणात आधार मिळत आहे़ जवळपास १५ ०० किलो गहू,तांदूळ समाजातील दानदात्यांच्या तसेच विदर्भ वतन वृत्तपत्राच्या पुढाकाराने गरजूंना देण्याचे कार्य सुरू आहे़