नागपुरात आणखी चौघांना कोरोनाची लागण,संख्या ७७ वर

293

विदर्भ वतन,नागपूर– नागपुरात कोरोनाचे आणखी चार रुग्ण सापडले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यासोबत नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. हे सर्वजण सतरंजीपुरा येथे करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामधील तिघांना आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले असून एकाला लोणारा येथे विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. नागपुरात आतापर्यंत १२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेले आहे. नागपूरमधील सतरंजी भागात वास्तव्यास असणाºया ६८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर तपासणी केली असताना त्यांनी करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झाले होते. सुरुवातील न्यूमोनिया झाल्याची तक्रार असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरु झाली होती. या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत ४० हून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.