शासनाने नाभिक समाजाकडे लक्ष द्यावे..नरेश लक्षणे

277

या कोरोना महामारी व लॉकंडाऊन मुळे सलुनची दुकाने पूर्णतः बंद आहेत. यामुळे सलुन व्यवसायकिचा धंदा हिरावला आहे. आम्ही शासनाचा निर्णयाचा आदर करतो व या निर्णयाचे नाभिक एकता मंच दुकानदार संघानी तीन दिवसाअगोदर बंद चे आव्हान केले. व सलुन दुकानदार बंधूनी बंद ला 100% सात दिली त्या नंतर सरकारच्या लॉकडाऊन चे पण काटेकोर कोरपणे निर्णयाचे पालन पण करत आहोत. परंतु या महामारी च्या अस्या स्थितीमध्ये अनेक सलुन दुकानदार तसेच सलुन कारागिरवर्ग व परिवाराचा उदरनिर्वाह यांनी कसा करावा अशा प्रशन नाभिक समाजा समोर उभा झाला आहे. 90% सलुन वेवसायिकांचे दुकाने किरायाचे आहेत.अनेक दिवसापासून दुकाने बंद असल्यामुळे दुकानाचा व घर किराया कसा दयाचा.असा प्रश्ण निर्माण झाला आहे. आमच्या संघटने तर्फे मागील काही मागण्या पूर्ण पण झाल्या नाहीत व आता या कोरोना महामारीच्या संकटातही आम्हाला आतापर्यंत शासना तर्फे कोणतीही मदद मिळाली नाही.तरी शासनाने सलुन व्यवसायिकांना, नाभिक समाजाला व नाभिक विद्यार्थी मुलामुलींना शिक्षणा मध्ये सवलत व आर्थिक मदत लवकरात लवकर करून दयावी,अशी मागणी नाभिक एकता मंच केंद्रीय सलुन दुकानदार संघ (अध्यक्ष ) नरेश लक्षणे व संघटने तर्फे करत आहोत.