आचार्य प्रशांत गायकवाड यांची ‘वर्ल्ड बुकात’ नोंद

191

प्रतिनिधी
विदर्भवतन / नागपूर : जगातील ४७ देशांच्या कलावंतांना भारतीय कला आणि संस्कृती शिकविण्याचा जागतीक विक्रम आचार्य प्रशांत गायकवाड यांनी केला. या विक्रमाची २५ फेब्रुवारी २०२० रोजी ‘वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमांतर्गत १५ मार्च रोजी गायकवाड यांना शाल श्रीफळ, वर्ल्ड बुकचे मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमात वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड (इंग्लंड) चे भारतातील प्रतिनिधी प्रदिप मिश्रा, महाराष्टा्रतील प्रतिनिधी धर्मेंद्र देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नागपूर नगरीचे नाव जागतीकस्तरावर नेऊन ठेवण्यात आले असून प्रशांत गायकवाड यांच्या आई-वडीलांनी भारताला एक रत्न दिले असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली.