Home गोंदिया बँक आॅफ बडोदाचे एटीएम बंद

बँक आॅफ बडोदाचे एटीएम बंद

92 views
0

विदर्भ वतन / नवेगाव बांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध हे व्यावसायीक दृष्टीने तसेच शैक्षणिक दृष्टीने महत्वाचे गाव आहे. सदर गावामध्ये परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात. गावात देना बँक आणि बँक आॅफ बडोदा या दोन बँकांच्या शाखा असून सदर शाखेत एटीएम मशीन गत दोन महिन्यांपासून बंद पडलेल्या अवस्थेत आहे. या बँकेतील ग्राहकांना आर्थीक व्यवहार सोयीचे जावे म्हणून शासनाने देना बँकेची शाखा येथे सुरू केली. परंतु बँक आॅफ बडोदा नावापुरती एटीएम मशीन उभी ठेवून एटीएममधील व्यवहार बंद ठेवले असल्याचे दिसून येते. त्यामुळे अवेळी पैशाची गरज पडल्यास लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. बँक व्यवस्थापकाला विचारणा केली असता त्यांचे कडून कोणतेच समाधानकार उत्तर मिळत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष घालून एटीएम तत्काळ सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे.