नागपूरात ५४ कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण?

219

विदर्भ वतन,नागपूर – कोरोना रोगाचे संकट देशावर गडद होत असतांनाच महाराष्ट्र राज्यासह नागपूर शहरात कोरोना रू ग्णांचा आकडा वाढतो आहे़ रविवारी १७ कोराना बाधीत आढळले असतांनाच मंगळवारीही स्थिती काही वेगळी नव्हती़ सोमवारी ४९ कोराना पाँझिटीव्ह रूग्ण होते तर मंगळवारी हा आकडा ५४ वर पोहोचला़ सतरंजीपुरा,मोमिनपुरा तसेच अनेक भागांवर पोलिसांचा कडा पहारा असून परिसरात प्रवेशबंदीही करण्यात आलेली आहे़
राज्यभरात 2 हजाराहून अधिक लोक संक्रमित आहेत. यातच आता औरंगाबादमध्ये कोरोनामुळे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घाटीत भरती करण्यात आले होते. भरती केल्यापासून रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. मंगळवारी दुपारी दीड वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता कानन येळीकर यांनी दिली आहे.
आरोग्या विभागाने सांगितल्यानुसार आज 121 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यात मुंबईमधून 92, नवी मुंबई 13, ठाणे 10 आणि वसई-विरार (पालघर जिल्ह्यात) 5 आणि एक रायगडमध्ये रुग्ण सापडला आहे.
सोमवारी राज्यात एका दिवसांत सर्वाधिक 352 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यातील 70% (242) रुग्ण फक्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबई एकूण 1540 पॉझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. याआधी गुरुवारी सर्वाधिक 229 रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2455 वर पोहोचली आहे. धारावीत मंगळवारी सकाळी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर पाच नवीन रुग्ण समोर आले आहेत. यासोबत धारावीतील एकूण कोरोनाग्रस्त संख्या 59 झाली आहे.
मुंबईतील सर्वाधिक प्रभावित वरळी कोळीवाड भागाला बीएमसीने ‘कंटेनमेंट झोन’ घोषित केले आहे. यानंतर येथील लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शासनाने राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची अधिसूचना महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे जारी केली आहे.