3 मे पर्यंत वाढला लॉकडाउन, 20 एप्रिलपासून अत्यावश्यक गोष्टींना परवानगी

356

नवी दिल्ली. देशाताली लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपुष्टात आला. त्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला. यामध्येच त्यांनी ही सर्वात मोठी घोषणा केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जारी राहणार असल्याचे घोषित केले आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘‘माझे बोलणे समाप्त करण्यासाठी आपले सहकार्य मागत आहे.’’

1. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या. प्रामुख्याने ज्यांना जुने आजार आहेत त्यांची विशेष काळजी घ्या. त्यांना कोरोनापासून वाचवायचे आहे.

2. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मण रेषा यांचे पूर्णपणे पालन करा. घरात बनलेले फेस कव्हर किंवा मास्क लावणे बंधनकारक आहे.

3. आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा. गरम पाणी आणि काढा यांचे सेवन करा.

4. कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी आरोग्य सेतु मोबाइल अॅप आवश्य डाउनलोड करा. इतरांनाही ते डाउनलोड करण्यासाठी प्रेरित करा.

5. शक्य होईल तितक्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या. त्यांच्या जेवण आणि आवश्यक गरजांची पूर्तता करा.

6. आपल्या उद्योगात काम करणाऱ्यांशी सहानुभूती ठेवा. त्यांना नोकरीवरून काढू नका.

7. स्वच्छता कामगार, पोलिस कर्मचारी, डॉक्टर्स यांना मान द्या त्यांचा सत्कार करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 मार्च रोजी देशाला संबोधित करताना 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू करण्याचे सांगितले होते. या दिवशी देशभर स्वयंस्फूर्तपणे सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. तसेच संध्याकाली लोकांनी आपल्या घरातून थाळ्या आणि टाळ्या वाजवून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिस, प्रशासन आणि आरोग्य विभागाचे आभार मानले होते.  पीएम मोदींनी 24 मार्च रोजी संबोधित करताना कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी 25 मार्च पासून 14 एप्रिल पर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते, की कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी लक्ष्मण रेषेचे पालन करावे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 एप्रिल रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. यामध्ये त्यांनी 5 एप्रिल रोजी लोकांना रात्री 9 वाजता नऊ मिनिटांसाठी सर्व लाइट बंद करून दिवे, मेणबत्या आणि टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते.