Home गोंदिया वादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान

वादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान

0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

गोंदिया/ भंडारा – जवाहरनगर परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे़. झाडे उन्मळून वीज तारांवर पडल्याने सुमारे २० तास वीजपुरवठा खंडित होता़ तर शुक्रवारी लाखांदूर तालुक्याला फटका बसला़.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळी वादळी वा-यासह पावासाला सुरूवात झाली़. त्यातच मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले़. नागरिकांनी मिळेल त्याठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न केला़ सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस सुरू होता़. ठाणा येथील उच्च ुदाबाच्या वीज तारांवर झाड कोसळल्याने तारा तुटून पडल्या़ ठाणा- जवाहनगर आयुध निर्माणीकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला असलेले झाड तारांवर कोसळल्याने २० ते २५ विघुत खांब उन्मळून पडले़. गारपिटामुळे गहू, हरभ-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ वादळी वाºयामुळे काही घरांचे छप्पर उडाले़. या पावसामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here