स्मशानात रोज २४ मृतदेह, मृतदेह बुजण्यासाठी जागा नाही

413

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था – छायाचित्र इटलीतील लोम्बार्डीचे आहे. जेव्हा १५ ट्रकमधून ९७ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा प्रत्येकाचे डोळे भरून आले. बर्गामोतील स्मशानात मृतदेह बुजण्यासाठी जागा राहिलेली नाही. यामुळे रुग्णालयातून मृतदेहांना बर्गामो प्रांतातून बाहेर पाठवण्यात आले. शहरातील शवागार भरले आहेत. स्मशानात रोज २४ मृतदेह येताहेत. यामुळे मृतदेह शेजारच्या राज्यांत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ५० सैनिकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. बरगामो प्रांतातील चर्च ऑफ ऑल सेंट्सचे पादरी मार्को बरगामेली यांनी सांगितले की, रोज शेकडो जणांचा मृत्यू होत आहे. त्यांना कोठे दफन करायचे हे समजत नाहीये.

इटलीचे पंतप्रधान ग्युसेप कोंते यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊन ३ एप्रिलनंतरही वाढवले जाऊ शकते.

४० हजार लोकांना लाॅकडाऊन तोडल्यामुळे दंड ठोठावण्यात आला अाहे. पोलिसांनी ७ लाखांची तपासणी केली आहे.

वो शहरात ३३०० जणांची तपासणी करण्यात आली. येथे २४ तासांत नवे प्रकरण अाले नाही. इटलीत कोरोनामुळे पहिला मृत्यू येथेच झाला होता.