Home गोंदिया बहुउद्देशीय हायस्कूल विद्यार्थ्यांचे सुयश

बहुउद्देशीय हायस्कूल विद्यार्थ्यांचे सुयश

105 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया 

अर्जुनी/मोरगाव:- येथील बहुउद्देशीय हायस्कूल चे वर्ग आठवीचे तब्बल पाच विद्यार्थी NMMS परिक्षेत उत्तीर्ण होऊन ते शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले आहेत.
डिसेंबर महिन्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS ) अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेला बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी/मोरगाव येथील १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील ९ विद्यार्थी उत्तिर्ण झाले तर कु. गायत्री शहारे, श्रेयश बडोले, राहुल शेंडे, कु. सुहानी शहारे व कु. निकीता टेंभूर्णे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी हुमे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षक मोरेश्वर बोकड़े तथा सर्व शिक्षक व आई वडील यांना दिले.
विशेष म्हणजे या शाळेत जुलै महिन्यापासूनच दररोज प्रार्थनेच्या पुर्वी ४५ मिनिटे वर्ग आठवीसाठी NMMS परिक्षा, शिष्यावृत्ती परिक्षा, वर्ग पाचवी साठी नवोदय परिक्षा, शिष्यवृत्ती परिक्षा याचे मार्गदर्शन तासिका घेतल्या जातात. अणि त्यामुळेच आज आम्ही यश सम्पादन करु शकलो असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.