जिल्ह्याला पुन्हा गारा व अवकाळी पावसाचा फटका

206
  • रब्बी पिकांचे नुकसान : उत्पादन घटणार, वातावरणातील बदलाचा परिणाम

       विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

        राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि गुरवार ला सायंकाळ च्या सुमारास गारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा व अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटक पांढरी, नवेगावबांध, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा, मुंग, तुर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाउस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले आहे . मागील पंधरा दिवसांपासुन सतत अवकाळी पाउस आणि गारपीट होत असल्याने रब्बीतील गहु, हरभरा आणि भाजीपाल्या ची पिके पुर्णपणे भुईसपाट झाली. त्यामुळे शेतक-यांना हाती आलेले पिके गमाविण्याची वेळ आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मिरची आणि टरबुजाच्या वाड्या मोठ्या प्रमाणात असुन या ठिकाणी टरबुज आणि मिरची विदेशात सुध्दा पाठविली जाते. सध्या मिरचीचा पहिला तोडा सुरू असुन शेतक-यांनी तोडणी केलेली मिरची वाळविण्यासाठी ठेवली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली मिरची भिजल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टरबुजाचे पीक सुध्दा निघण्याचा मार्गावरून असुन त्याला सुध्दा गारपीठ आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हाती आलेले पिक गमाविण्याची वेळ आली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रब्बीतील पिके पुर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत पाउस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.