Home Breaking News निर्भयाच्या दोषींना फाशी, पहिल्यांदा एकाच वेळी चारही आरोपींना फाशी

निर्भयाच्या दोषींना फाशी, पहिल्यांदा एकाच वेळी चारही आरोपींना फाशी

0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था:- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आले. एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निर्भया प्रकरणी चारही दोषींना आज तिहार तुरुंगात फाशी दिली गेली. तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते.

दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ‘डेथ ‌वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती. चालू वर्षात २२ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्यासाठी काढण्यात आलेले ‘डेथ वॉरंट’ कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here