Home क्राइम जगत कंत्राटदारासह उपअभियंत्याची शेतकऱ्याला धमकी, आमगाव पोलीसांत तक्रार दाखल

कंत्राटदारासह उपअभियंत्याची शेतकऱ्याला धमकी, आमगाव पोलीसांत तक्रार दाखल

70 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी /गोंदिया
गोंदिया :- आमगाव तालुक्यातील ठाणा-कोसमटोला या रस्ताचे ७४ लाख रुपये खर्चून बांधकाम हाती घेण्यात आले. दरम्यान वनविभागाच्या जागेत खोदकाम झाल्याने वनविभागाचे वनपाल जी.आय. लांजेवार यांनी जेसीबीने सुरु असलेले खोदकाम बंद पाडून शासकीय पंचनामा केला. तसेच त्या पंचनाम्यावर रस्त्याशेजारी शेती असलेला शेतकरी गजानन बिसेन यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी घेत असताना नायब तहसिलदार सुध्दा हजर होते हि प्रकिया सुरु असतानाच कंत्राटदार आदित्य परमार व उपविभागीय अभियंता दिनेश कापगते यांनी शेतकरी बिसेन याला शिविगाळ करुन मारण्याची धमकी दिली. असल्यामुळे बिसेन यांनी कंत्राटदार व उपअभियंता यांच्या विरूध्द आमगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रस्ताच्या दुरुस्तीच्या सुरवातीच्या कामापासूनच नागरिकांनी अंदाजपत्रकात व फलकावर दाखविल्या नुसार योग्य साहित्य वापरण्याची मागणी केली. ती मागणी करणारे ठाणा येथील शेतकरी गजानन बिसेन असल्याने कंत्राटदार परमार व या कामाचे पाहणी करणारे उपअभियंता कापगते यांनी १६ मार्च रोजी रस्ता बांधकामाच्या पाहणी वेळी कामात अडथळा निर्माण केल्यास गोंदियात पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारची धमकीच दिल्याने शेतकरी बिसेन यांनी दोंघांन विरुद्ध आमगाव पोलिसा स्टेशन येथे तक्रार केली आहे. अधिका-यांनी ही कंत्राटदाराची बाजू घेण्यापेक्षा कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे महत्वाचे असतांना नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार या ठिकाणी घडला. सदर रस्त्याचे काम ५ प्रकियेत करायचे होते. त्यामध्ये पहिला रस्ता खोदणे व त्यावर मातीकाम करणे, त्यानंतर पाणी घालून रोलरने दाबणे, खडीकरण करुन मुरुमाचा थर देणे असाप्रकारे रस्त्याचे बांधकाम करायचे होते. पुन्हा खडीकरण त्यानंतर डाबंरीकरण करुन काम करायचे होते. रस्त्याची बाजू भरण्यासाठी वनविभागाच्या क्षेत्रात जेसीबीने खोदकाम करुन माती घालण्यात आल्याने मुळासह झाडे उमळून पडल्याने ती झाडे मरणासन्न अवस्थेत पोचल्याने शेतकरी गजानन बिसेन यांनी आमगाव येथील तहसिलदारासह वनविभागाचे अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधितांना माहिती दिली. त्याआधारे १६ मार्च रोजी सदर रस्त्याची पाहणी करीत असतांना कंत्राटदार परमार व उपअभियंता कापगते यांनी शेतकरी बिसेन यांना शिविगाळ करीत मारण्याची धमकी सर्वासमक्ष दिल्याने कंत्राटदाराची मुजोरी समोर आली आहे.