महाराष्ट्र नाभिक महामंडळ चा निर्णय..३ दिवस सलून बंद…

224

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर:- महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर व शाखेतर्फे अतिशय तातडीच्या वेगवान घडामोडीत महाराष्ट्र नाभिक महामंडळ ने देशभरात पसरत असलेल्या कोरोना वायरस ला पायबंद घालण्यासाठी राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार जनहितार्थ नागपूर जिल्हातील सर्व सलुन गुरुवार पासून तीन दिवस बंद ठेवण्यात यावे, असे आवाहन समस्त सलुन व्यावसायिक बांधवांना केले असून त्याप्रमाणे सूचना सर्व विभागीय शाखांना केल्या आहेत.  महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे मार्गदर्शक भगवानराव बिडवे (अध्यक्ष रा. नाभीक संघ ) प्रभाकरराव फुलबांधे ( महासचिव, रा. नाभिक महासंघ) प्रदेश अध्यक्ष दत्ताजी अनारसे, राज्य कार्याध्यक्ष अंबादास पाटील, राज्य उपाध्यक्ष बंडूभाऊ राऊत, विदर्भ विभागीय अध्यक्ष श्याम आस्करकर नागपूर चे जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी यांनी सांगितले की हा निर्णय समाजाचे हितार्थ तसेच सलुन व्यावसायिक बांधवांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या व्यापक दृष्टीकोनातून घेण्यात आल्याचे एका प्रसिद्धीपत्रकात कळविले आहे.