Home गोंदिया बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर छापा सहा जणांना अटक, तीन लाखांचा मुद्येमाल...

बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर छापा सहा जणांना अटक, तीन लाखांचा मुद्येमाल जप्त

110 views
0
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राहूल चुटे / तालुका प्रतिनिधी / आमगाव
आमगाव :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील गाडगेबाबा वार्ड क्रमांक
२ मध्ये एका गोठ्यात अवैधरित्या सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. असुन ३ लाख ८ हजार ४८० रूपयांची अवैध दारू सह मुद्येमाल जप्त केला असुन, सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई आज पहाटे दिडच्या सुमारास करण्यात आली आहे.

आमगावच्या गाडगेबाबा वार्ड क्रमांक २ मध्ये संदीप असाटी यांच्या घरातील बाजुच्या गोठ्यामध्ये अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहिती वरून या विभागाच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला. यावेळी स्पिरीट, पाणी व अर्क यांच्या वापरातुन बनावट देशी मद्य बनवुन ते मद्य बनावट लेबल लावलेल्या बाटलीत भरण्याचे व सिलबंद करण्याचे काम सहा जणांकडुन सुरू असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पथकाने सहाही जणांना ताब्यात घेत ४० पेट्या बनावट देशी मद्य, ९० मिली क्षमतेच्या रॉकेट देशी दारू या नावाने लेबल असलेल्या ४ हजार देशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, इलेक्ट्रिक मोटर, स्पिरीटच्या वापरासाठी २०० लिटर क्षमतेचे २ प्लॅस्टिक ड्रम, पाण्याचे २० रिकामे कॅन, एक टाटा एस कंपनीचे चारचाकी वाहन, ११५ व लि. तयार केलेली दारू, १५० व लि. स्पिरीट असा एकूण ३ लाख ८ हजार ४८० रूपयांचा मुद्येमाल जप्त केला. आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आलेल्या आरोपीमध्ये सिध्दांत भाउराव नंदागवळी वय २९ रा. श्रीनगर, गोंदिया, संतोष मन्साराम वाघमारे वय ३९ रा. बाजपेयी वार्ड, गोंदिया, आनंद राजेश नागपुरे वय २३, रा. श्रीनगर गोंदिया, कैलास दिनेश इनवाते वय ३२ रा. श्रीनगर, गोंदिया, पवन ग्यानीराम शहारे वय ३३ रा. बाजपेयी वार्ड, गोंदिया, नागेश्वर मनोज धमगाये वय २३, रा. कु-हाडी, ता. गोरेगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत