Home क्राइम जगत गोंदियातील एमआय मोबाईल स्टोअर्समध्ये भरदिवसा नजरे समोर चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

गोंदियातील एमआय मोबाईल स्टोअर्समध्ये भरदिवसा नजरे समोर चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

136 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

  • विदेशी बनून आले अन् हजारोचा चुना लावून गेले

          राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- विदेशी बनून आलेल्या दोन व्यक्तींनी गोंदिया शहरातील बाजार पेठेत एमआय मोबाईल स्टोअर्स मध्ये जावून पॉवर बँक घायचे सांगून विदेशी चलन (डॉलर) दाखवून ते एक्स्चेंज करण्याचा बहाण्याने चक्क मोबाईल दुकानदारास ३५ हजार रूपयाचा चुना लावत हाथसफाईने केली. हि घटना भरदिवसा व नजरे समोर झाल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमरे मध्ये कैद झाली आहे. विदर्भाची मिनी मुंबई म्हणून अशी ओळख गोदिंया शहराची आहे. मुंबईच्या धर्तीवर आता गोंदियातही ही वाटचाल सुरू आहे. तेव्हा भरदिवसा दोन अनोळखी युवक शिवम बावणकर यांच्या मालकीच्या एमआय मोबाईल स्टोअर्स मध्ये पॉवर बँक विकत घेण्यासाठी येतात व त्या मोबाईल दुकान चालकाची फसवणूक करीत आम्ही विदेशातून आलो असल्याचे सांगत त्याच्या सोबत इंग्लिश मध्ये बोलत विदेशी चलन (डॉलर) दाखवून तुम्ही आम्हाला भारतीय चलनाचे मोठे नोट दाखवा असल्याचे सांगितले. मात्र याच दरम्यान त्यापैकी एकाने दुकान चालकास गोष्टीमध्ये व्यस्त करून त्यांच्या गल्ल्यातील ३५ हजार रूपयाची रोख रक्कम हेराफेरी करून लंपास केली. मात्र त्यावेळी दुकान दाराला आपले पैसे चोरी ला गेले मात्र कळले नाही काही वेळा नंतर पैसे मोजले असता तेव्हा लक्षात आले कि पैसे चोरी ला गेले व हि घटना दुकानातील सीसीटीव्ही कैमरे मध्ये पाहिल्या नंतर मोबाईल दुकानचालकास लक्षात आल्याने त्याने लगेच शहर पोलिस स्टेशन गोंदिया येथे घटनेची माहिती दिली.व पोलिसांनी त्या अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.