
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर : रूद्र नोबल्स बहुउद्देशिय शिक्षण संंस्था नागपूरव्दारा रूद्र-सुर्या गु्रपतर्फे जनजागृती कार्यक्रम दर रविवारी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय (मेडिकल) येथे राबविण्यात येतो. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष जयपाल ताकोते यांनी सांगीतले की, मागील तीन वर्षांपासून मी विवेकानंद रोटी बँक या नावाने मेडिकल परिसरात गरीब रूग्णांच्या परिवाराकरिता रविवारी भोजनदान कार्यक्रम राबवितो. मेडिकलमधील गरीब रूग्नांना उपचाराकरिता जवळ पैसे नसतात. सोबतच त्यांच्या परिवारातील सदस्यांना पोटाची भूक भागविण्याची चिंता असते. अशावेळी गरीब परिवार व रूग्णांना संस्था सामाजीक जाणीव व आपले समाजीक दायित्व समजून भोजन वितरणाचे निशुल्क कार्य करते. तसेच गरिब रूग्नांना ३० रूपयात श्रीकृष्ण नगर येथील दवाखाण्यात उपचार उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे २०१९ पासून संस्था स्वामी विवेकानंद रोटी बँक या नावाने मेडिकल परिसरात गरीब रूग्ण व त्यांच्या परिवाराकरिता अन्नदान कार्यक्रम राबविते. ही सेवा निरंतर सुरू असून भविष्यात व्यापक प्रमाणात वाढविण्याचा विचार आहे. आई-वडिलांचे किंवा आपले पितृ यांचे पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या परिवाराच्या इच्छेप्रमाणे दिलेल्या शुल्काच्या माध्यमातून त्यांना सोबत घेऊन अन्नदान कार्यक्रम केला जातो. सेवेमध्ये रूद्र-सुर्या ग्रुपचे संपूर्ण सहकार्य असते. प्रशांत नखाते, प्रफुल्ल वांढरे, प्रदीप पौनिकर, पुरूषोत्तम भोसले, अंकित यादव आणि त्यांची चमू नियमीत अन्नदान कार्यक्रमात सहयोग करतात.
या विधायक कार्यात सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून जनसेवा जागृत व्हावी व ज्यांना सेवा घ्यायची असेल त्यांनी रूद्र-सुर्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून आपली सेवा प्रदान करण्यासाठी प्रशांत नखाते यांच्याशी ९४०३७६७०२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

