
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर : धावत्या गाडीत कोरोनाचे रुग्ण असल्याचाय संशय सह प्रवाशांना आल्याने एकाची मध्यरात्री तर एकाची पहाटे रेल्वेस्टेशनवर वेळोवेळ तपासणी करण्यात आली़. तपासणी झाल्या नंतर त्यांना सोडण्यात आले.
कोणत्याही व्यक्तिला संशया दरम्यान, सर्दी-खोकला असलेल्या प्रत्येकाकडे संशयाने पाहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे़ सोमवारी मध्यरात्री १२:२० वाजता आणि बुधवारी पहाटे ३:४५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर हा अफवेचा करोना आढळल्याने धावपळ उडाली होती़. १२८०३ विशाखापट्टणमे-हजरत निजामुद्दीन स्वर्णजंयती एक्सपे्रसच्या बी-१ बोगीतील एका प्रवाशाला सामान्य सर्दी, खोकला आणि ताप होता़. मात्र, तो करोनाग्रस्त असल्याची अफवा पसरली़ स्वर्णजयंती एक्सपे्रस रात्री १२़.४० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर पोहोचली़ काही वेळातच उपस्टेशन व्यवस्थापकांना त्याच्याबाबत माहिती देण्यात आली़. तत्काळ रेल्वे रुग्णालयाला याबाबत कळविले़ डॉ. ज्योत्सना साखरे गाडी येण्याआधीच स्थानकावर पोहचल्या़ दक्षता घेता त्या प्रवाशाला खाली उतरवून प्राथमिक तपासणी करण्यात आली़. खबरदारी म्हणून मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आले़. मेयोतील डॉक्टरांनी तपासणी आणि औषधोपचार केल्यानंतर त्याला सुट्टी देण्यात आली़. दुसरा प्रकार १२६२६ केरळ-नवी दिल्ली-त्रिवेंद्रम एक्सपे्रसमध्ये बुधवारी पहाटे झाला़ नागपुरातील एक तरूण बी-२ बोगीतून भोपाळ ते नागपूर असा प्रवास करीत होता़. या गाडीची वेळ पहाटे ४़.०५ ची आहे़ मात्र्र, गाडी आपल्या निर्धारित वेळेपूर्वी म्हणजे ३़.४५ वाजताच पोहोचली़. या तरूणाला सर्दी आणि खोकला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली़.

