युवतीने दिला लग्नास नकार, प्रियकराने केली आत्महत्या

236

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर : पे्रयसीने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे निराश झालेल्या प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना डिफेंस परिसरात घडली. आकाश अरूण बोदले (२८) असे मृत प्रियकराचे नाव आहे.
आकाश हा दवलामेटीतील आठवा मैल परिसरातील रामजीनगरात राहत होता. तो आॅर्डिन्स फॅक्टरी येथे ठेकेदारीत नोकरी करत होता. त्याचे त्याच परिसरात राहणार्या एका युवतीवर तीन ते चार वर्षापासून प्रेम होते. आकाशने ९ मार्चला तिच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घातली होती. पण तिच्या कुटुंबीयांनी त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिले होते. या प्रकारामुळे आकाश निराश झाला. रविवार दि. १५ मार्च रोजी मध्यरात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे चार वाजताच्या सुमारास शेजारी राहणार्यांना त्यांच्या घराच्या खिडकीतून आकाशने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी लगेच याची माहिती आकाशचा भाऊ आणि वहिनीला दिली. माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाशने लिहून ठेवलेली सुसाइड नोट जप्त केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविला. मात्र या घटनेची तक्रार अद्याप दाखल करण्यात आलेली नाही.