विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून तसेच नागरिकांची एका ठिक ाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी निल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी विषाणू एका व्यक्तिपासून दुसर्या व्यक्ति पर्यंत पसरू नये यास प्रतिबंध घालण्यासाठी सदर पोलिस फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ लागू करणे आवश्यक असल्याचे समाधान झाल्यामुळे.
त्याअर्थी, वर्धा जिल्ह्यातील सिनेमागृहे, शाळा/कॉलेज, आठवडी बाजार, उत्सव, जत्रा हे बंद ठेवण्याची खात्री झाली आहे.
त्याअर्थी, विवेक भीमनवार, जिल्हा दंडाधिकारी,वर्धा प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून, वरील परिसरात दिनांक १७ मार्च, २०२० या कालावधीत सकाळी ०६:०० ते रात्री १२:०० या वेळात गर्दी टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम अन्वये खालील सुचनासह प्रतिबंधात्मक आदेश लागू करित आहे.
- १ ) ह्या आदेशानुसार ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये.
२) कोरोना वायरसच्या अनुषंगाने कोेणत्याही नागरीकांनी समाजात, जनमानसात अफवा, अप्रचार व भिती व्हॉटसअप, फेसबूक, ्यूटर, वृत्तपत्र सोशलमिडीया व होर्डींग इत्यादीवर प्रसारीत करू नये.
३) मिरवणुका, रॅली, सामुहीक कार्यक्रम, भाषणबाजी यांना प्रतिबंध करण्यात येते.
4) धार्मिक स्वरूपाचे समोपदन, धर्मपरिषद, धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये.
5) सदरचा आदेश संपुर्ण वर्धा जिल्ह्यांचे सिमाक्षेत्राकरीता लागू राहील.
6) या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड १९७३ चे कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

