Home चंद्रपूर राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उघाने, अभयारण्ये बंद

राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उघाने, अभयारण्ये बंद

0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर:- करोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले असून राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उघाने, अभयारण्ये १८ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत़. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षण (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सोमवारी प्रसिध्दी प्रत्रकारव्दारे ही माहिती दिली़. करोनामुळे विदेशातील पर्यटन टाळून काही पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाचा पर्याय चोखाळत व्याघ्र पर्यटनाला पसंती दर्शवली होती़. परिणामी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फुल्ल झाला़ पण आता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वनविभागाने राज्यातील ताडोब्यासह सहा व्याघ्र प्रकल्प ३१ मार्चपर्यंत बंद पकडण्याचा निर्णय घेतला आहे़. दरम्यान, टिपेश्वर अभयारण्य ३१ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनी कळविले आहे़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here