वाघाने केलेल्या हल्ल्यात वनमजूर ठार

198

विदर्भ वतन न्युज पोर्टल, चंद्रपूर 

चंद्रपूर- चंद्रपूरापासून सुमारे १५ किमी अंतरावरील बोर्डा गावानजीकच्या वनविकास महामंडळाच्या जंगलात वाद्याच्या हल्ल्यात वनमजूर ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. मारोती लिंबा नागोसे(६०) असे मृतकाचे नाव आहे़. चालू वर्षातील व्याघ्रहल्ल्याची ही आठवी घटना आहे़ मागील वर्षभरात वन्यजीव हल्ल्यात २३ बळी गेले आहेत़. नागोसे हे गावानजीकच्या वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ३९४ मध्ये बांबू कटाईसाठी गेले होते़ त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला़ गावक-यांकडून माहिती मिळाताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे़ सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून गस्त वाढवण्यात आला आहे़. मृताच्या नातेवाईकांना तातडीची पंचवीस हजारांची रोख रक्कम देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी बोलतांना दिली़.