
- शासनातर्फे शाळा कॉलेज, मॉलवर जाण्यास सख्ती
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर :- करोनाचा प्रादुर्र्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, काँलेज आणि अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़. मात्र दहावी, आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रानुसारच होणार आहेत़. ग्रामिण भागातील शाळा, काँलेज मात्र सुरू राहतील़ यासोबतच राज्यातील सर्व माँलही बंद ठेवण्याचा आदेश सरकारने शनिवारी जारी केला़.
गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन सातत्याने राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे़. त्यामुळे शाळा काँलेजांना सुट्टी जाहीर करण्यात येत होती़ मात्र, परिक्षांचा काळ लक्षात घेऊन शिक्षणसंस्था बंद करण्यासाठी एकमत होेत नव्हते़ अखेर राज्य सरकारने हस्तक्षेप करीत शनिवारी निर्णय जाहीर केला़. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी विधासभेत निवेदनाव्दारे राज्यातील करोनाच्या उपायांची दिली़.
करोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, जिम बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे़. राज्यातील सर्व जिल्हाधिकार, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत़. राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, कॉलेजे, अंगणवाड्याही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़. शाळांप्रमाणे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे़. या काळातील दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना, परीक्षाकाळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत, याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यावी , असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले़ टोपे यांच्या निवेदनानंतर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्या सहीने यासंदर्भातील परिपत्रक सर्व विभागांना पाठविण्यात आले़.

