Home गोंदिया  गारपीठ पडल्याने ५ हजाराच्या वर पोपटाचा जंगलात मृत्य

 गारपीठ पडल्याने ५ हजाराच्या वर पोपटाचा जंगलात मृत्य

127 views
0
  • गावकऱ्यांमध्ये कोरोनाची भीती असताना पुन्हा गावकरी पोपटाच्या मृत्यूने दहशतीत 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कटंगी डयाम परिसरात असलेल्या सागवानच्या जंगलात दोन दिवसा आधी झालेल्या गारपिटीमुळे ५ हजाराच्या वर पोपटाचा मृत्यू झाला असून, शकडो पक्षी जखमी झाले आहे. सध्या त्याच्यावर वन विभागाने उपचार सुरु केले आहे.
दोन दिवसा आधी हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यासह सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला . तर काही ठिकाणी गारपीठ देखील पडली असून . याचा मोठा फटका गोरेगाव तालुक्यातील कटंगी ड्याम परिसरात असलेल्या सागवानच्या जंगलात वात्सव्यास असेल्या पोपटांना बसला. अंगावर गारपीट पडल्याने ५ हजरच्या वर पोपट मृत्यू मुखी पडले तर शेकडो पोपट जखमी झाल्यास, त्याच्यावर उपचार सुरु आहे . आज सकाळी गावातील गुराखी जंगलात जनावरे चारण्या करिता गेली असताना . त्यांना हि मृत्यू मुखी पडलेली आणि जखमी पोपटे दिसली असून. त्यांनी याची माहिती गोरेगाव येथील निसर्ग मंडळाच्या सदस्यांना आणि वन विभागाला दिली.  दोन्ही चमूने आज दिवसभर जंगलात रेस्क्यू ऑपरेशन राबवत जखमी पोपटांना उपचारा करिता पाठविले.  मृत पोपटांना गोडा करीत त्यांना जमिनीत पुरण्यात आले एकीकडे संपूर्ण देश हा कोरोना व्हायरसच्या भीतीने हादरला तर  दुसरीकडे गावा शेजारी असलेल्या जंगलात ५ हजारच्या वर पोपट मेल्याने त्यांची दुर्गंध हि गावात येत असल्याने संसर्ग जन्य रोग गावात पसरेल अशी भीती गावकऱ्यां मध्ये पसरली असून, वन विभागाने आठ दिवस जंगलात गुरे चरायला नेण्यास माजावं केला आहे.
याच जंगलात चार दिवसा आधी २ लाखाच्या वर पोपटाची शाळा भरत होती मात्र अवकाळी पाऊसाने हजारो निर्दोष पोपट मृत्यू मुखी पडल्याने जिवंत असलेली पोपटें आपल्या मित्रांची परत येण्याची वाट पाहत आहेत.